नवी दिल्ली : साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर नागपुरचे नामवंत सहित्यिक नंदा खरे यांना जाहीर झाला आहे. सहित्यिक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला २०२० मधील साहित्य अकादमिचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, साहित्यिक नंदा खरे यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला आहे.
नंदा खरे विदर्भातील नागपूरचे रहीवाशी आहेत. ते स्थापत्य अभियंते असून विदर्भातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राहिले आहेत. बांधकाम क्षेत्रात कार्यरत राहतानाच त्यांनी लेखन कार्य सुरू केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी बांधकाम क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर पूर्णवेळ लेखन कार्याला दिले.
विज्ञान, भूशास्त्र सारख्या विषयांवर अनेक पुस्तके लिहिल्यानंतर २०१२ पासून नंदा खरे यांनी उद्या ही कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. २०१४ मध्ये “उद्या” ही कादंबरी प्रकाशित झाली. यावेळी त्यांनी पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून आभारही मानले. तसेचही माझी वैयक्तित भूमिका मी मांडत असल्याचेही खरे यांनी आपल्या अल्प निवेदनात म्हटले आहे. पुरस्कार नाकारला असला तरी वयोमानाचा विचार करत फार लेखन कार्य होणार नसल्याची खंत नंदा खरे यांनी व्यक्त केली.