ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सलगर ते श्रीशैल पदयात्रेस प्रारंभ

अक्कलकोट ,दि.३१ : (प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील सलगर ते श्रीशैलम् पदयात्रा कै.कलव्वाबाई बसप्पा बिराजदार यांच्या स्मरणार्थ शिवानंद तोटप्पा बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली मागील 17 वर्षापासून सालाबादाप्रमाणे यंदाही सोमवार, दि.29 मार्च 2020 पासून पदयात्रेस प्रारंभ होवून श्रीशैलकडे मार्गस्थ झाले.
ही पदयात्रा सलगर – मादनहिप्परगा मार्गे हडलगी, यळसंगा मार्गे चौडापूर येथे मुक्काम दुसर्‍या दिवशी महांतेश्वर गुड्ड येथून रात्रो प्रस्थान होवून शहापूर, रायचूर, तेलंगणा, आंध्र, आंतकूर मार्गे श्रीशैल येथे पोहोचणार आहेत. सदर पदयात्रेत सलगर गावातील 75 सकल भक्त व विशेष करुन महिलांचा देखील यामध्ये सहभाग आहे.
दररोज 50 कि.मी. अंतर कापत दहा दिवसात ते 7 एप्रिल 2021 रोजी श्रीशैल येथे पोहोचणार आहेत. तद्नंतर तेथे कै.कलव्वाबाई बसप्पा बिराजदार यांच्या स्मरणार्थ विशाल बिराजदार यांच्यावतीने सलग सहा दिवस दासोहच्या माध्यमातून (महाप्रसाद) सेवा देणार आहेत. 13 एप्रिल गुढीपाडव्या दिवशी श्रीशैल येथील रथोत्सवानंतर सर्व सद्भक्त मंडळ दर्शन घेवून सलगरकडे परतणार असल्याचे पदयात्रेचे मार्गदर्शक सलगर ग्रा.पं.सदस्य मल्लिनाथ भासगी यांनी सांगितले.
या पदयात्रेत विशाल बिराजदार, मल्लिनाथ भासगी ग्रा.पं. सदस्य, जाफर लालखॉ, वे.ईरसंगय्या स्वामी, राघवेंद्र स्वामी, सागर चिकमळी, श्रीशैल पाटील, बाबूराव व्हरफेटी, लक्ष्मीकांत कालीबत्ते, बसवराज समाणे, चंदप्पा समाणे, भिमाशंकर डोंगराजे, रवि म्हेत्रे, बसवराज रोडगीकर, केदार पोलासे, शिवराज पाटील, शिवमुर्ती समाणे, वैजनाथ माशाळे सचिन धोत्रे, तम्मा शटगार, कलप्पा डोंगराजे, हणमंत पाटील, फकीरप्पा बोरगाव, प्रेमला पराणे, शांताबाई समाणे, गजराबाई जमादार, गौराबाई डोंगराजे, भौरम्मा पाटील आदी महिला सदभक्त देखील मोठ्या उत्साहाने मार्गस्थ झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!