ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर, २० हून अधिक ठिकाणांवर छापेमारी

मुंबई : समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आले आहेत. आझमी यांच्याशी संबंधित सुमारे २० हून अधिक ठिकाणांवर विभागानं छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तर्क-वितर्क लढवले जात आहे. आयटी विभागाने आझमी यांच्याशी संबंधित मुंबईसह देशभरातील एकूण सहा शहरांमध्ये धाडी टाकल्या आहेत.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, त्यांचे निकटवर्तीय दिवंगत गणेश गुप्ता आणि त्यांच्या पत्नी आभा गणेश गुप्ता यांच्या काही मालमत्तांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. बेहिशेबी मालमत्ता, गुंतवणूक आणि काळा पैसा यासंदर्भात या धाडी टाकल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सातत्याने केंद्र सरकार व पंतप्रधान मोदींवर टीका चालवली होती. आज सकाळी अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नटवरलाल असा केला होता तसेच केंद्र सरकारच्या धोरणांवरही सडकून टीका केली होती. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!