ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सांगवी बु च्या सरपंचपदी वर्षा भोसले तर उपसरपंचपदी लक्ष्मण डांगे यांची निवड

अक्कलकोट दि.२६ : अक्कलकोट तालुक्यात अतिशय चुरशीच्या ठरलेल्या सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा भोसले यांची तर उपसरपंचपदी लक्ष्मण डांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर गावामध्ये एकच जल्लोष करण्यात आला.

१५ जानेवारी २०२१ रोजी सांगवी बु ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये जय जगदंबा सर्वधर्मीय ग्रामविकास पॅनल ला ९ पैकी ८ जागा जिकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. तर परिवर्तन ग्रामविकास पॅनलला १ जागेवर समाधान मानावे लागले. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये सांगवी बु ग्रामपंचायतीचे आरक्षण खुला महिला प्रवर्गासाठी निघाले असून खुला महिला सरपंच पदाकरिता वर्षा बाळासाहेब भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी नेमणूक निवडणूक निर्णय अधिकारी सुयोग देशमुख यांनी जाहीर केली. उपसरपंचपदासाठी लक्ष्मण डांगे यांचा एकमेव अर्ज असल्याने उपसरपंच म्हणून लक्ष्मण डांगे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री सुयोग देशमुख यांनी केली.

यावेळी ग्रामसेवक एस. दुधनी, तलाठी आय. ए.शेख, कोतवाल जाकीर कागदे, शिपाई जावेद मुल्ला हे उपस्थित होते.यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य सुभाष सोनकांबळे, राजिया कागदे, मुमताज कागदे, वासंती सलबत्ते, तहसीन शेख, काजल राठोड, संभाजी खरात,पॅनल प्रमुख संजयकुमार भोसले, विष्णू भोसले, अबूबकर शेख, मेजर बाळासाहेब भोसले, नबीलाल शेख, इरफान शेख, गणेश मोरे, सुभाष देवकर, हाजीमलंग मुजावर सर्व ग्रामस्थांनी यांनी नूतन सरपंच, उपसरपंचाचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!