ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा, राज्यात लवकरच होणार शिक्षक भरती

मुंबई : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातुन मोठी घोषणा केली आहे. राज्यात अवकरच शिक्षक भरती होणार आहे. याबाबत स्वतः राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली आहे. या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर ट्विट करून माहिती दिली आहे.

राज्यातील शिक्षण विभागात एकूण २०६२ जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. यात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल च्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहेत की, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खासगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा..! असे ट्विट शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात ६ हजार १०० जागा भरण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!