ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तब्बल २४  वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एका नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मल्लिकार्जुन खर्गे यांना ७,८९७ मते मिळाली, तर शशी थरूर यांना १,०७२ मते मिळाली.

याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत होती. त्यापैकी मल्लिकार्जुन खर्गे यांना शशी थरूर यांचा पराभव करण्यात यश आले.

  • ‘काँग्रेसचे अध्यक्ष होणे ही अत्यंत सन्मानाची, मोठ्या जबाबदारीची बाब’ – शशी थरूर

अध्यक्षपदाच्या निवडणूक निकाला नंतर कॉँग्रेसचे नेते यावर शशी थरूर यांनी नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले आहेत. शशी थरूर ट्विट मध्ये म्हणाले,  ‘काँग्रेसचे अध्यक्ष होणे ही अत्यंत सन्मानाची, मोठ्या जबाबदारीची बाब आहे, या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मी मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन करतो. अंतिम निकाल खरगे यांच्या बाजूने लागला, काँग्रेसच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मला त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करायचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!