ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता; कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेच – शरद पवार

मुंबई: पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहेत. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या आहेत. मात्र त्यात तोडगा निघु शकला नाही. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि ते योग्य नाही. केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे,  असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचं शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला काही घटकांचा विरोध आहे. त्यामुळे कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेच असल्याचे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच हे दुरुस्ती विधेयक लवकरात लवकर मांडलं पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

दोन दिवसाच्या अधिवेशनात कृषी कायदा येईल असं वाटत नाही, पण आला तरी सगळ्यांशी चर्चा करून येईल असं मला वाटतं, असेही शरद पवार बोलताना म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!