कोल्हापूर : राज्यपालपद हे माझ्यासाठी योग्य नसून जेव्हा राज्यपाल करण्यात आलं तेव्हा वेदना झाल्याचं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर देत टोला लगावला आहे. शुक्रवारी जैन समाजाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते की, राज्यपालपद मिळाल्यानंतर मला दु:ख झालं, हे पद माझ्यासाठी योग्य नसून फक्त वेदनाच पदरात पडल्या आहेत, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केल होत.
शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत. महाराष्ट्राची एक परंपरा आहे, लोकांनी पीसी अलेक्झांडर यांच्यापासून अनेक सुसंस्कृत राज्यपाल पाहिलेले आहेत. अतिशय उच्च दर्जाचा व्यवहार असलेले राज्यपाल महाराष्ट्राला लाभलेले आहेत. परंतु भगतसिंह कोश्यारी हे पहिले राज्यपाल आहेत की ज्यांच्यावर लोकांना टीका करावी लागत आहे, असं म्हणत शरद पवारांनी भगतसिंह कोश्यारींना जोरदार टोला लगावला.
राज्यपालांनी महाराष्ट्राच्या हितासाठी मार्गदर्शन करणं अपेक्षित असतं. परंतु कोश्यारींबाबत नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्याकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नसून ते सतत चुकीची वक्तव्ये करत आहेत. त्यामुळं आता जनताच त्यांच्यावर नाराज झाल्याचंही शरद पवार म्हणाले. त्यामुळं आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळं त्यांची केंद्राकडून दुसऱ्या राज्यात बदली केली जाणार की ते राजीनामा देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आ