ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. यावेळी त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सच्या साह्याने मुंबईत भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ही स्थिर असल्याचे बोलले जात आहे.

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम येथील आमदार आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाटदेखील सामील होते. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचा पराभव केला. एकनाथ शिंदे यांच्या मंत्री मंडळात त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज होते.

संजय शिरसाठ हे त्यांचा घरी असताना सोमवारी रात्री त्यांच्या छातीत दुखू लागले होते. या नंतर त्यांना तातडीने औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांना हृदय विकारांच्या झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्यांतर त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सच्या साह्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरसाट हे गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!