अक्कलकोट, दि.११ : राज्यात शिवसेनेत
गट पाडुन शिंदे गटात जाणा-याना जाऊदे, नव्या कट्टर शिवसैनिकांना संधी देऊ,असे अक्कलकोट शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकी चार जिल्हाप्रमुख, महिला आघाडी,युवासेना,विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख, शहरप्रमुख,माजी सर्व जिल्हाप्रमुख यांची बैठक घेण्यात आली.कांही अपवाद वगळता सर्व पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना देशमुख म्हणाले, बंडखोरीचा परिणाम अक्कलकोट तालुक्यावर झालेला नाही,आम्ही सर्व मातोश्रीवर प्रेम करणारे शिवसैनिक आहोत ,जरी कोणी जाणारे असतील तर जाऊदे ,नव्या कट्टर शिवसैकाना संधी देऊ व पुन्हा जोमाने काम करु,असेही ते म्हणाले.यावेळी अक्कलकोट तालुका (जिल्हाउपप्रमुख )संतोष पाटील तालुकाउपप्रमुख प्रा.सुर्यकांत कडबगावकर उपप्रमुख आनंद बुक्कानुरे,सैपन पटेल, सोपान निकते,शहरउपप्रमुख मल्लिनाथ खुबा, तालुका महिला संघटिका वर्षा चव्हाण ,शहर संघटिका वैशाली हावनूर ,युवासेनेचे शहर प्रमुख विनोद मदने ,शिवानंद कोगनुर, मोनप्पा सुतार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.