ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षण महर्षी शिवशरण खेडगी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

 

अक्कलकोट दि.२१:- शिक्षणमहर्षी कै. शिवशरण खेडगी यांचे शुक्रवार दि.२३ जून रोजी प्रथम पुण्यस्मरणा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत संयोजकानी दिली.
दि.२३ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता रक्तदान शिबीराचे उदघाटन डीवायएसपी विलास यामावार यांच्या हस्ते व अक्कलकोट न प चे मुख्याधिकारी सचिन पाटील, पो नी महेश स्वामी, पो नी जितेंद्र कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानाचे शुभारंभ तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बी.सी. ए. विभागाच्या डिजिटल क्लासरूमचे उदघाटन रविकांत पाटील हस्ते होणार आहे. बाल आरोग्य तपासणी शिबिर तज्ञ डॉक्टर डॉ राहुल लिंबीतोटे यांनी पार पडणार आहेत.
” शिव शरण अक्कलकोट भूषण” सन्मान सोहळा निमित्त पुरस्कार वितरण व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम डॉ. जयसिद्धेश्वर म्हास्वामीजीं मनिप्र शिवबसव म्हास्वामीजीं, श. ब्र.जयशांत लिंगराध्य शिवाचार्य म्हास्वामीजीं, मनिप्र शिवलिंग म्हास्वामीजीं, प्रभूशान्तलिंगेश्वर म्हास्वामीजीं यांच्या दिव्यसानिध्यात होणार आहे. सदर पुरस्कार शिक्षण सेवा म्हणून प्रा. बसवराज कोनापुरे, चाचा बिराजदार, समाजकार्य बाबा मिस्त्री, ऍड शरद फुटाणे, आरोग्य सेवा डॉ संतोष मेहता, डॉ अशोक राठोड, कृषी सेवा शिवनिंगप्पा चौलगी, गंगाधर बिराजदार, उदयोग व्यवसाय प्रमोद कोरे, रेवणसिद्ध पाटील यांना देण्यात येणार आहे. सदर निवडी निवड मंडळाने केली आहे. कार्यक्रम सीबी खेडगी इंटरनॅशनल स्कूल प्रांगणात होणार आहे,अशी माहिती चेअरमन, व्हा.चेअरमन, प्राचार्य, उपप्राचार्य, व बसलिंगप्पा खेडगी मित्र परिवार यांनी
दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!