अक्कलकोट : 6 जून हा संपूर्ण महाराष्ट्रात पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत मध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे शासन आदेशानुसार ग्रामपंचायत गोगांव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच कमलाकर सोनकांबळे हे होते. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन कलेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष भद्रप्पा मुलगे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वज पूजन सरपंच संघटना तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक दयानंद चोळे, शरणप्पा कलशेट्टी, श्रीशैल पाटील, बसप्पा आलूरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रस्तावना करताना दयानंद चोळे म्हणाले की, अठरा पगड जातींना एकत्र आणून, जुलमी राजवट मोडीत काढून ज्यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं, अशा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या राज्याभिषेक दिनी त्रिवार वंदन करतो. हिंदवी स्वराज्याचा एकच ध्यास घेऊन संपूर्ण जीवन मातृभूमीला समर्पित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज 348 वा राज्य अभिषेक दिन ग्रामपंचायत गोगांवमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रम समारोप राष्ट्रगीत म्हणून करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोजगार सेवक परमेश्वर गायकवाड, शिपाई संजय देडे, शिपुत्र कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले.