गुजरात : गुजरात दंगली प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवून गुजरात सरकारची बदनामी करून त्यांना फाशी देण्याचा डाव आंदोलकांनी रचला होता असा धक्कादायक खुलासा गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांच्यासह तिन जणांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने हे दोषारोपपत्र दाखल केले आहे. सेटलवाड यांच्यावर गुजरात सरकारची बदनामी करण्याचा कट आखल्याचा तसेच गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर पोलिसांनी लावला आहे.
निवृत्त पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी बनावट पुरावे सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सरकारचा भाग असतानाही आर. बी. श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांनी खोटी कागदपत्रं तयार केली आणि नंतर त्यांचा अधिकृत कागदपत्रांमध्ये समावेश केला. एवढेच नाही तर दंगल पीडितांची फसवणूक करून त्यांची खोट्या कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या. तिस्ता सेटलवाड यांनी पीडितांना मदत केली न केल्यास परिमाण भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोपही एसआयटीने केला आहे.