ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक ! पुण्यात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या ३१ वर्षीय अमर मोहिते नावाच्या विद्यार्थ्यांने पुण्यातील सदाशिव पेठेत गळफास घेऊन आत्महत्या केली.

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तो पीएसआयच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडला होता. तेव्हापासून तो नैराश्यात होता. त्यानंतर त्याने आज सकाळी सदाशिव पेठेतील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमर मोहिते हा मुळचा सांगली जिल्ह्यातील होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो पुणे शहरात आला होता. सदाशिव पेठेतील एका वसतीगृहात तो राहात होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या पीएसआयच्या फिजिकल परीक्षेतून तो बाहेर पडला होता.

तेव्हापासून त्याला नैराश्य आले होते. त्यातच कोरोना काळात अनेकदा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे तो आणखी नैराश्यात गेला होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!