ध्यास विश्वसार्ह बातमीचा

२ कोटींच्या निधीतून श्री मल्लिकार्जुन देवस्थानचा कायापालट होणार; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ

 

अक्कलकोट, दि.२३ : श्री मल्लिकार्जुन देवस्थान हे अक्कलकोट शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. दोन कोटीच्या विकास निधीतून मंदिराचा कायापालट होईल, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.सोमवारी, महाराष्ट्र राज्य प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या विकासाकरिता आमदार कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या २ कोटी रुपये खर्चाच्या जिर्णोद्धार कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.नि.प्र बसवलिंग महास्वामीजी हे होते.यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवीताई कल्याणशेट्टी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, श्री मल्लिकार्जुन देवस्थान हे
खूप जुने संस्थानकालीन मंदिर आहे या ठिकाणी भाविकांची मोठी श्रद्धा आहे.दरवर्षी यात्रा,रथोत्सव मोठ्या प्रमाणात
होतो याचाच विचार करून राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी मंजूर केला आहे या पुढच्या काळातही या मंदिराच्या विकासासाठी आपण सहकार्य करु.राजसत्तेबरोबर धर्मसत्ता टिकणे देखील गरजेचे आहे.देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व तीर्थक्षेत्र, हिंदूंची मंदिरे याचा चौफेर विकास साधण्याचे काम करत आहेत तीर्थक्षेत्राला जोडणारे रस्त्याची कामे वेगाने पूर्ण होत आहेत आणि या मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला निधी देणे हे सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य होते. बसवलींग महास्वामीजी म्हणाले, श्री मल्लिकार्जुन देवस्थानमार्फत होत असलेल्या कार्याबद्दल समाधानी आहे.या कार्याचा विस्तार होण्यासाठी आपणही सहभागी होऊ आणि मंदिराचा जीर्णोद्धार,शिखर बांधकाम तसेच सुवर्णकलश या तिन्ही संकल्पना पूर्ण होईपर्यंत कोणीही मागे हटायचे नाही. सर्वांनी एकत्र येऊन हा संकल्प पूर्ण करायचा आहे त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे आणि आमदार कल्याणशेट्टी यांनी स्वतः पाठपुरावा करून दोन कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.प्रास्ताविक करताना विश्वस्त महेश हिंडोळे म्हणाले,बऱ्याच वेळा एखाद्या देवस्थानला किंवा मंदिराला निधी पाहिजे असेल तर ती मागणी करावी लागते मात्र आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वतः पाठपुरावा करून या मंदिराला दोन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला.अडीचशे वर्षांपूर्वीचे हे जुने मंदिर आहे.यापूर्वी देवस्थानने देखील वेळोवेळी जीर्णोद्धार करण्याचे काम केले.
मंगल कार्यालय,व्यापारी संकुल यासारखे उपक्रम हाती घेऊन विस्तार करण्याचे सुरूच आहे याला वेळोवेळी सर्वांचे
सहकार्य मिळाले आहे.कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी ,उपाध्यक्ष बसवराज माशाळे ,सचिव स्वामींनाथ हिप्परगी,बसलिंगप्पा खेडगी,विजयकुमार लिंबितोटे, प्रशांत लोकापुरे,प्रकाश उन्नद ,शिवकुमार कापसे,राजशेखर नागुरे,शिवकुमार कापसे,शिवशरण जोजन,राजशेखर
हिप्परगी, महानंदा स्वामी,आप्पासाहेब पाटील,सुवर्णा साखरे,मिलन कल्याणशेट्टी,अविनाश मडीखांबे,
कांतू धनशेट्टी, राजशेखर उंबराणीकर,सुनील गोरे,निलकंठ कापसे,नागराज कुंभार,मल्लिनाथ स्वामी,विलास कोरे,
दयानंद रोडगे,निखिल राजशेखर हिप्परगी,शिवराज स्वामी,अप्पू पराणे,शरण कापसे, अभिषेक लोकपुरे,रुद्रय्या स्वामी,सतीश मठपती सिध्देश्वर पुजारी,सचिन कलबुर्गी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले तर आभार विद्याधर गुरव यांनी मानले.

केवळ अर्ध्या तासात साडेआठ
लाख रुपयांची लोकवर्गणी

दक्षिणात्य शैलीचे शिखर बांधकाम देखील लवकरच होणार आहे या बांधकामासाठी केवळ एका अर्ध्या तासांमध्ये साडे आठ लाखांची लोकवर्गणी जमा झाला यात
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वतः पाच लाख रुपये जाहीर केले तसेच शिवराज स्वामी १ लाख, मलम्मा पसारे १ लाख, विलास कोरे १ लाख, शिवप्पा रामपुरे ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.जीर्णोद्धार कामानंतर सुवर्णकलश करण्याचा संकल्प देखील देवस्थानच्या विश्वस्तांनी सोडला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!