ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या धर्मसंकीर्तन कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन, अक्कलकोटकरांना ३ जुलैपर्यंत मिळणार सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी

 

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. २३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील प्रांगणात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे पुरोहित मंदार पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी वे.शा.सं. श्री अण्णू महाराज, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, तहसिलदार बाळासाहेब सिरसट, नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावार, अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन पहिल्या पुष्पाचे उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर थोर संगित दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडीतजी ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा ‘नक्षत्रांचे देणे, कार्यक्रम सादर करण्यात आला. यांच्या समवेत डॉ.राजेंद्र दुरकर, विशाल गुंडतवार, ऋतुराज कोरे, शैलेश देशपांडे, विवेक परांजपे, यश भंडारे, मनीषा निचळ, केतन गोडबोले, सोनाली श्रीखंडे, शिरीष रामरीकर यांनी साथ दिली. या सर्व कलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

राधा मंगेशकर यांच्या नक्षत्राचे देणे या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयदेव जयदेव जय शिवराया, जय शिवराया, विश्वाचा..! जय ज्या स्वामी समर्थ..!, एैरणीच्या देवा.., ही हिंदुशक्ती शंभु तेजा हे प्रुभो शिवाजी राजा, मना रे…! नको लाजू..! आदी मराठी व हिंदी गाण्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभास श्रोतेगणांची प्रचंड गर्दी झाली होती.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, अक्षता खोबरे, कोमल खोबरे, जयश्री मगर, स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कोमल मचाले, संपदा श्रीमान व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, भाऊ कापसे, मनोज निकम, विश्वस्त संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, प्रा. शरणप्पा आचलेर, शरणप्पा फुलारी, ओंकारेश्वर उटगे, अँड.संतोष खोबरे, अरविंद शिंदे, योगेश पवार, अतिश पवार, प्रथमेश इंगळे, मनोज इंगोले, राजु नवले, सनी सोनटक्के, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अमित थोरात, किरण पाटील, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, प्रा.भीमराव साठे, भरत राजेगावकर, संजय गोंडाळ, सिद्धेश्वर हत्तुरे, दिनेश पटेल, राजशेखर उमराणीकर, कल्याणराव पाटील, प्रा.प्रकाश सुरवसे, अप्पू कलबुर्गी, विक्रांत गोरे, प्रशांत लोकापुरे, प्रतिष किलजे, धनराज शिंदे, श्रीकांत मलवे, विजय इंगळे,पिंटू दोडमनी, देवानंद परिचारक, वासू कडबगावकर, मैनुद्दीन कोरबू, सौरभ मोरे, वैभव मोरे, सोमनाथ सुतार, स्वामिनाथ गुरव, श्रीशैल कुंभार, राहुल इंडे, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, ज्ञानेश्वर भोसले, विनायक भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले. या प्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे पुरोहित मंदार पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त न्यासाच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले.

गुणीजन गौरव :

यामध्ये विशेष गौरव पुरस्कार समाजसेवक सुरेश काका सूर्यवंशी व उद्योजक स्वामिनाथ हिप्परगी, प्रसिध्द व्यापारी प्रकाश किलजे, उत्कृष्ठ स्थापत्य अभियंता सोमनाथ लंगोटे यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी गौरव :

तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

उद्याचे कार्यक्रम

शनिवार दि. २४ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘भावभक्ती गीतांजली’ लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते सौ. प्रतिभा थोरात व सहकलाकार पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे.

अक्कलकोट विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी हे आजारपणातून लवकरात लवकर बरे व्हावेत या करिता श्रींच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!