अक्कलकोट तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार म्हेत्रे यांनी घेतली बांधकाम मंत्र्यांची भेट
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.
मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पात या सहा रस्त्यांचा समावेश करून या गावांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.यात मैंदर्गी -सातनदुधनी, बोरोटी, बबलाद ,
दुधनी अर्जुनगी रस्ता, दुधनी ते नंदर्गी राज्य हद्द रस्ता ,अक्कलकोट- बासलेगाव ,उडगी तोळणुर रस्ता ,रुद्देवाडी- तळेवाड सातनदुधनी रस्ता, अक्कलकोट -स्टेशन, गौडगाव बुद्रुक ,शावळ ,हिळळी,शेषगिरी राज्य हद्द रस्ता,कणबस -करजगी घुंगरेगाव शावळ या रस्त्यांना निधी देण्याची मागणी आपण निवेदनाद्वारे केली आहे.गेल्या अनेक वर्षापासून हे रस्ते खराब आहेत.हे रस्ते चांगले झाल्यास दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्याचे महाविकास आघाडी सरकार रस्त्याचा अनुशेष भरून काढत आहे.ही बाब चांगली असून ग्रामीण भागातील रस्ते जोपर्यंत सुधारत नाहीत. तोपर्यंत विकास शक्य नाही. मंत्री चव्हाण हे अक्कलकोट तालुक्याला निधी देण्याबाबत सकारात्मक असून या कामांना लवकरच मंजुरी मिळेल,असे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, मोहन देडे, शिवराज स्वामी आदी उपस्थित होते.