कोल्हापूर : मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारले आहे . राज्यात विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या नंतर राजश्री शाहू महाराज समाधीस्थळावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे . कोरोनाचा काळ असल्याने मोर्चा ऐवजी बंधने पाळून मुक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी हे आंदोलन होत आहे.
या आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती, शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, संभाजीराजे यांची पत्नी संयोगिताराजे छत्रपती, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्यासह इतर राजकीय नेते सहभागी झाले आहेत.