तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२० : सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील कर्जाळ गावा जवळ चंद्रकांत स्वामी यांच्या शेतातील
साठ फूट खोल विहीरीत सिमेंटचा टँकर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.चालकाचा गाडीवरचा तोल गेल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेनंतर सोलापूर अक्कलकोट रस्त्याच्या हलगर्जीपणा बद्दल मात्र प्रश्न उपस्थित होत आहे . कारण रस्त्याच्या अगदी पाच फुटावर मोठी विहीर आहे आणि ती न बुजवल्याने हा अपघात घडला आहे.रविवारी पहाटे चार वाजता सिमेंटचा बारा चाकी टँकर गाडी क्रमांक एम एच ४५ /ए एफ ८८५५ ही पुणे हून शेडमला सिमेंट भरण्यासाठी जात होता. समोरील वाहन अंगावर आल्याने टँकर बाजूला घेण्याच्या नादात रस्त्याच्या
कडेला जाऊन खोल विहीरीत जाऊन कोसळला.यात टँकरचे चालक कृष्णा वारे यांना सुदैवाने पोहता येत असल्याने पाण्यातून गाडीचा दरवाजा उघडून वरती आले.त्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत.रोडच्या बाजूला विहीरीवरती
संरक्षक भिंत नसल्याने हा अपघात घडला आहे.साठ फूट खोल विहीरीत टँकर पडून
ही टँकर ड्रायव्हर मात्र पूर्णपणे सुखरुप असल्याचे कळते.विहीरीत टँकर पडल्याने संबंधित कर्जाळ येथील बागायतदार शेतकरी चंद्रकांत स्वामी यांच्या विहीरीवरील मोटार,पाईपचे मोठे नुकसान झाले आहे.टँकरचा अर्धा भाग पूर्णपणे विहीरीत बुडाला आहे. हा अपघात पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी अक्कलकोट सोलापूर रस्त्यावर मोठी गर्दी केली होती.
भविष्यात पुन्हा
अपघाताची शक्यता
भविष्यात यापेक्षा भीषण अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता ही वर्तवली
जात आहे.कारण जीआर कंपनीकडून या विहीरीच्या वरच्या बाजूला संरक्षक भिंत बांधली गेली नाही अथवा संभाव्य धोका ओळखून विहीर बुजविण्यात आली नाही. यापुढे ही कर्जाळ येथील चंद्रकांत स्वामी यांच्या मळ्या जवळ मोठा अपघात
होण्याची शक्यता नाकरता येत नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
वारंवार तक्रार
करूनही दुर्लक्ष
वारंवार तक्रार करुन ही संबंधित जीआर कंपनीकडून रोड करताना विहीरीत पडलेला गाळ आणि विहीरीवरती संरक्षक भिंत बांधली गेली नाही.यामुळेच हा अपघात घडला आहे.भविष्यात आमच्या जीवालाही धोका असल्याने विहीरी वरती रोडच्या बाजूला त्वरित संरक्षक भिंत बांधण्यात यावी.किंवा विहीर बुजवून नुकसान भरपाई द्यावी.
चंद्रकांत स्वामी शेतकरी कर्जाळ.