अक्कलकोट (प्रतिनिधी) : सोलापूर ते अक्कलकोट राज्य महामार्गाचे संपूर्ण काम पुर्ण झाल्यावरच टोल वसुली करा, तसेच सोमवारी सकाळ पासून टोल वसुली चालू करण्यात आलेले टोल नाका त्वरीत बंद करण्यात यावे, याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्याकडे दिले आहे.सोलापूर ते अक्कलकोट रस्त्याचे काम हे प्रगतीपथावर असुन ही बाब समाधानाची बाब व स्वागताची आहे. पण या प्रकल्पाचे अनेक कामे हे अद्यापही काही ठिकाणी काम बाकी आहे.कुंभारी,वळसंग, कर्जाळ येथ उड्डाण पुलाच्या कामाला आत्ता सुरवात झाली आहे. त्या पुलाचे काम अद्याप पर्यंत पूर्ण झालेले नाही .मात्र वळसंग नजीक टोल बसवण्यासाठी टोल वसुली साठी लगीनघाई सुरू आहे. संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करणे चुकीचे आहे काम पूर्ण करूनच शासनाच्या नियमानुसार ई निविदेच्यानुसार सुरू करावेत अन्यथा रिपाइंच्यावतीने ‘खळखट्याक’ आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिला आहे .यावेळी शुभम मडिखांबे उपस्थित होते.