सोलापूरः जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना दुसर्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा होत नाही असे बोलले जात होते, मात्र पुन्हा कोरोना होत असल्याचे या घटनेवरुन उघड झाल्याने भितीदायक चित्र निर्माण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. ते सध्या सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोलापूर जिल्हावासियांनी मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करून कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.
वर्षभरापूर्वी जिल्हाधिकारी शंभरकर सोलापूरात रुजु झाले होते. त्यांनी सोलापुरात जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्याचा अवघ्या महिनाभरातच सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव झाला होतो.