नागनाथ विधाते
दक्षिण सोलापूर, दि.२४ : इंटरनॅशनल डान्स अॅड म्युझिक फेस्टीवल काठमांडू नेपाळ २०२३ येथे झालेल्या स्पर्धेत सोलापूरातील नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या एकूण दहा विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून सर्वच विद्यार्थिनीना बक्षीस मिळाले आहे. या स्पर्धेत सोलापूर, पुणे, कलकत्ता, ओरिसा, आसाम, राजेस्थान, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातून नृत्य कलाकार आले होते.
गुरु सौ. मोनिका द्यावनपल्ली यांना नृत्य गुरु गौरी सन्मान देऊन गौरविण्यात आले. समूह नृत्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. कु. वेदिका आंधळकर आणि मधुरा लातुरे यांना डुएट मध्ये पहिले बक्षिस मिळाले व कु.सौंदर्या सचिन वाघमारे व श्रेया उदगिरी यांना डुएट मध्ये शस्त्रीय नृत्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. कु. रेणू खंडू भोसले, त्रिगुणा द्यावनपल्ली, अक्षया भिमनपल्ली यांना एकल नृत्यात प्रथम क्रमांक व कु. रितिका श्रीमल यांना व्दितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.कु.हर्षिता शहाणे हिला पाशात्य नृत्यात प्रथम क्रमांक व कु.दुर्गा उपळाईकर हिला सेमी क्लासिकल मध्ये प्रथम क्रमांक मिळाले.
नृत्यगुरु श्री. रघुनाथ गडडम सर, गुरु सौ. मोनिका द्यावनपल्ली गुरु सौ. लतिका बल्ला यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वत्र त्यांचे खुप कौतुक केले जात आहे.