सोलापूर,दि.१६ : दोन दिवसांपूर्वी
रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलीस ठाणे कडील अधिकारी अंमलदार रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना क्रांती चौक येथील होनराव यांचे दूध डेअरीचे शॉपिंग सेंटर विडी घरकुल कुंभारी येथे
काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असताना निदर्शनास आले. रात्र गस्तीवरील अधिकारी अंमलदार यांनी लागलीच त्यांना हटकले व त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन वळसंग पोलिस ठाणे येथे आणले व अधिक चौकशी केली असता त्यांचे जवळ चोरलेले मोबाईल, लॅपटॉप, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी सळई व इतर दरोडा टाकण्याकरिता लागणारे साहित्य मिळून आले. वळसंग पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना ५ जन संशयास्पद दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असताना मिळून आल्याची माहिती दिली. त्यावरून सातपूते यांनी सदर संशयित व्यक्तींवर कोठे गुन्हे दाखल आहेत का याबाबत सीसीटीएनएस विभागाकडील पोलीस हवालदार इकबाल शेख व वळसंग पोलिस ठाणे कडील प्रसाद मांढरे, कविता बिराजदार यांना संपर्क साधून संयुक्तरित्या माहिती घेणेबाबत सुचविले. त्यावरून अतुल भोसले प्रभारी अधिकारी वळसंग पोलिस ठाणे यांनी सीसीटीएनएस विभागाकडून तात्काळ माहिती घेतली .तेव्हा सदर संशयितांपैकी शिवप्रसाद राजू कैची व राजू श्रीनिवास कुरक्याल याचे वर महाराष्ट्र व रंगारेड्डी राज्यात एकूण १३ (पुणे, हडपसर, वानवडी, सासवड, बदनापूर जालना, सोलापूर, नाचेराम रंगारेड्डी व इतर जिल्ह्यात) गुन्हे दाखल असले बाबत ची माहिती सीसीटीएनएस विभागाकडून मिळाली. त्यावरून लागलीच त्यांना अटक करण्यात आली व त्यांचेवर वळसंग पोलीस ठाणे येथे भादवि कलम ३९९ प्रमाणे गुन्हा दाखल करून माननीय न्यायालयासमोर
उभे करण्यात आले व पुढील अधिक तपासाकरिता त्यांची पोलिस कस्टडी घेण्यात आलेली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अतुल भोसले, पोसई हंचाटे, पोसई स्वामीराज पाटील, पोहा युनुस सय्यद, इकबाल शेख, अभिजीत रावडे, विक्रम माने, प्रसाद मांढरे, रोहित थोरात, सुनील राठोड, शैलेश सूर्यवंशी, धरेप्पा होनमोरे यांनी केली आहे.