क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे विचार घरोघरी पोचवा, कुरनूर येथे राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
अक्कलकोट, दि. १३ : शरद पवार बीसीसीआय अध्यक्ष असताना नेहमीच क्रिकेट खेळाच्या आणि युवकांच्या पाठीशी राहून युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा नेत्यांचे ध्येय व राष्ट्रवादीचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी युवकांनी जोमाने काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी केले. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या ८१ वाढदिवसानिमित्त कुरनूर येथे आयोजित राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा.प्रकाश सुरवसे, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे,शहर उपाध्यक्ष स्वामी चौगुले, पं. स. विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, भास्कर काळे, नागेश पाटील, अप्पू काळे, बाबासाहेब मोरे, योगेश निंबाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश सुरवसे म्हणाले की,शरद पवार यांच्या विचाराने खेडेगाव सुधारत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये
खेळाचा अजून विकास व्हावा त्यासाठी नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा असेल, असे ते म्हणाले.यावेळी बाळासाहेब मोरे, माणिक बिराजदार, शंकर व्हनमाने, स्वामी चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन संयोजक सचिन पवार यांनी केले. या स्पर्धेमध्ये अनेक पंचक्रोशीतील १७ क्रिकेट संघाने सहभाग नोंदवला असून या स्पर्धेचा अंतिम सामना आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कुरनूर येथील राष्ट्रवादीच्या शाखा उद्घाटनप्रसंगी होणार आहे, अशी माहिती दत्त क्रिकेट संघाने दिली आहे.