ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्य लोकसेवा आयोग (MPSC) ची परिक्षा ठरलेल्या दिवशीच घ्यावी – आमदार प्रणिती शिंदे यांचे सरकारला आवाहन.

सोलापूर : आज रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) यांनी एका नोटीफीकेशनव्दारे दि. 14 मार्च 2021 रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे MPSC स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. गेल्या काही वर्षापासून हे विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करून परिक्षेची तयारी करत होते. तसेच काही विदयार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पूणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी अनेक महिन्यांपासून वास्तव्य करीत आहेत. त्यासाठी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. तरी सुध्दा हे विद्यार्थी अगदी मनापासून या राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परिक्षेची तयारी करीत होते. परंतू आज अचानक महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) एका नोटीफीकेशनव्दारे ही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याची सुचना देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एवढे दिवस आपण केलेली मेहनत वाया जाते की काय अशी भावना निर्माण होवून असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे ते विद्यार्थी पुण्यामध्ये व महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव करून आंदोलन करीत आहेत.

याकरीता राज्य सरकारने या आंदोलनाची त्वरीत दखल घेवून दिनांक 14 मार्च 2021 रोजी ठरलेल्या वेळेत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) ची पूर्व परिक्षा घेण्यात यावी असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनाव्दारे केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!