ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पाच राज्यातील निवडणुकीचा एक्झिट पोल: यांचे येणार सरकार

कोलकाता: देशातील चार राज्यासह पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय रंग चढू लागले आहे. संपूर्ण देशाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. 27 मार्चपासून पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा एक्झिट पोलमध्ये समोर आले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलचा संघर्ष कमालीचा वाढला आहे. दोन वर्षांपासून भाजपने या ठिकाणी जोरदार कंबर कसली आहे.

ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार तृणमूल काँग्रेसला १४८ ते १६४ जागा मिळू शकतात. तर २०० जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला ९२ ते १०८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तृणमूलला ४३ टक्के, तर भाजपाला ३८ टक्के मतं मिळू शकतात.

एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या ओपिनिय पोल सर्व्हेतून पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरीत कुणाचं सरकार येणार याविषयीची पाहणी करण्यात आली. या पाच राज्यांमध्ये पश्चिम बंगालवर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केलं असून, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसविरोधात आघाडीचं उघडली आहे.

मागील आठवड्यात सरकार कोसळेल्या पद्दुचेरीतही विधानसभा निवडणूका होत आहे. ३० जागांसाठी होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाप्रणित एनडीएचं सरकार येणार असल्याचे संकेत मिळत आहे. एनडीएला ४६ टक्के मते, तर काँग्रेस ३६ टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आधारावर एनडीएला १७ ते २१ जागा मिळू शकतात. तर काँग्रेस आघाडीला ८ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये सीपीआयएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आघाडीचं सरकार सत्तेत आहे. डाव्याचं वर्चस्व असलेल्या केरळात यावेळीही भाजपाच्या पदरी निराशाचं पडण्याची शक्यता आहे. एलडीएफ आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत ८३ ते ९१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीला ४७ ते ५५ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपाला जास्तीत जास्त दोन जागा मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.

तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक आघाडीला २९ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे द्रमुकला ४१ टक्के मतं पडू शकतात. जागांचं गणित बघितलं तर अण्णाद्रमुकला ५८ ते ६६ जागा मिळू शकतात. दुसरीकडे द्रमुक आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता आहे. द्रमुकला १५४ ते १६२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

आसाममध्ये भाजपाप्रणित एनडीएच्या पारड्यात ४२ टक्के मत पडण्याचा कल दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेस आघाडीला ३१ टक्के मतं मिळू शकतात. तर इतर पक्षांच्या खात्यात २७ टक्के मतं पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ओपिनियन पोलनुसार १२६ जागा असलेल्या विधानसभेत भाजपाला ६८ ते ७६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर कांग्रेसला ४३ ते ५१ जागा मिळू शकतात. आसाममध्ये बहुमताचा आकडा ६४ आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!