सचिन पवार
कुरनूर,दि.१४ : विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका आता विद्यार्थ्यांना देखील बसताना दिसत आहे. खेडेगावात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असतात. अशातच एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मिटत नसल्याने विद्यार्थ्यांकडून खाजगी वाहनधारकांकडून अक्षरशा लूट होताना दिसत आहे.
एसटी चालू असताना विद्यार्थी पासच्या सवलतीने प्रवास करत होते आता मात्र कित्येक दिवसापासून एसटी बंद असल्याने प्रवास
करणे कठीण झाले असून वेळेवरही शाळा, महाविद्यालयमध्ये पोचता येत नाही, अशी खंत विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील एसटी सुरू सुरु व्हावे, यासाठी निवेदन देताना दिसत आहे. मात्र अद्याप देखील एसटी चालू होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पर्यायी व्यवस्था उभी करावी
विद्यार्थ्यांसाठी सरकारने वेगळा विचार करावा. वाढती महागाई, कोरना संकट आणि अशातच खाजगी वाहनांकडून आमची लूट सुरू आहे. यामुळे वेळेवर कॉलेजला पोहोचताही येत नाही. त्यामुळे सरकारने एसटी चालू होईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था करावी करावी – आनंद खांडेकर विद्यार्थी