ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मार्शल आर्ट किक स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलचे यश

कुरनूर : जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा संचलनालय पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १४, १७, १९ वर्षाखालील जिल्हास्तरिय शालेय सिकई मार्शल आर्ट व किक बॉक्सिंग स्पर्धेत अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलमधील १५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरिय सिकई मार्शल आर्ट व किक बॉक्सिंग स्पर्धेत यश संपादन केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे – १४ वर्षाखालील गटात सुमीत घोसले, ओमादित्या कोकळगी, आकाश चेंडके, अर्णव पाटील, अनंत पाटील, यशश्री देगील व धनश्री दणूरे.१७ वर्षाखालील गटात अथर्व मेणसे, आदर्श म्हेत्रे, प्राची होटकर, मेघा म्हेत्रे, दुर्गा भगरे मेघना म्हेत्रे तर १९ वर्षाखालील गटात शरणराज मेंथे, यशलक्ष्मी गुंजे, समृद्धी मेंथे या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक दयानंद दणूरे, सतिशकुमार परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे शितलताई म्हेत्रे व संस्थेचे उपाध्यक्ष अमोल जोशी सर, सायली जोशी मॅडम ममता बसवंती मॅडम, मुख्याध्यापिका गौरी दातार मॅडम, प्राचार्य डॉ. गणपती वाघमोडे सर तसेच पालक शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गाने अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!