ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सृजनशील शालेय स्पर्धांमधून देशाचे उत्तम नागरिक घडतात : सुनील शिनखेडे , कर्मयोगी अप्पासाहेबांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी व पब्लिक स्कूलचा उपक्रम

सोलापूर ,दि.१७ :’ शालेय जीवनातील वैविध्यपूर्ण स्पर्धांमधून देशाचे उत्तम नागरिक घडतात. त्यासाठी गुरुजन शालेय आंतरशालेय स्पर्धांमधून उत्तम संस्कार विद्यार्थ्यांना देत असतात.चित्र ,शिल्प, निबंध, भाषण -संभाषण,नाटक, कथाकथन या स्पर्धांमधून व्यक्तिमत्वाची जडणघडण होते.”
असे प्रतिपादन आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांनी केले. ते आकाशवाणी व संगमेश्वर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.हा संपूर्ण कार्यक्रम दूरदृष्टी प्रणालीद्वारे संपन्न झाला. याप्रसंगी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, प्राचार्य गायत्री कुलकर्णी ,प्रा.संतोष मडकी ,परीक्षक सरस्वती बताले, सरिता नागूर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सर्व मान्यवरांनी कर्मयोगी अप्पासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्राचार्य गायत्री कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वैष्णवी देशपांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने कृतज्ञतापूर्वक विशेष सन्मान करण्यात आला.त्यानंतर ‘श्री संगमेश्वर’ गीताचे प्रकाशन सुनील शिनखेडे यांच्या हस्ते झाले. गीतलेखन – प्रा संतोष मडकी (श्री सिद्धेश्वर वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेज ) यांनी केले आहे तर गायन आणि संगीत विनोद शेंडगे (पंढरपूर ) यांचे आहे. गीत लेखनाबद्दल प्रा.संतोष मडकी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यातआला. हे गीत कॉलेजच्या युट्युब वाहिनीवर उपलब्ध आहे.याप्रसंगी बोलताना सचिव धर्मराज काडादी म्हणाले की, ” संगमेश्वर परिवारामध्ये समूह भावनेतून काम करणाऱ्या मंडळींमुळे श्री संगमेश्वर गीत अत्यन्त कमी कालावधीत तयार झाले. कर्मयोगी अप्पांच्या चरित्रासोबत संगमेश्वरची जडण-घडण या मध्ये आलेली आहे.स्थानिक कलाकारांना प्राधान्य देऊन त्यांना सामावून घ्यावे असा विचार आला आणि त्यांची प्रतिभा रसिकांपर्यंत पोहचावी अशी अपेक्षा होती त्याप्रमाणे तीन व्हर्जनमध्ये हे श्री संगमेश्वर गीत तयार झाले. या टीममधील सर्वांचे कौतुक आहे.”

या उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रीती दुलंगे यांनी केले तर आभार सीमा सालोटगी यांनी मानले. याप्रसंगी डॉ. दिपाली करजगिकर, प्रा. सुहास पुजारी , प्रा. राजकुमार मोहोरकर, प्रा.संतोष पवार, राहुल कराडे,पब्लिक स्कुलचे राजशेखर पाटील, शोभा गोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!