मुंबई :राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी समाज माध्यमांवर सांगितले आहे.
या संदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या, अस ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
दरम्यान देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्याबरोबर ओमायक्रॉन बाधितांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. देशतील २१ राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-१९च्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनच्या ६५० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधि रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे.