लोकनेते सुर्यकांत बाणेगांव यांची चपळगावच्या विकासासाठी सतत धडपड ,चपळगाव ग्रामपंचायतीकडून अभिवादन कार्यक्रम
अक्कलकोट, दि.९ : स्व. सुर्यकांत बाणेगाव हे नेहमी लोकांच्या हिताचा निर्णय घेत होते. त्यांच्या जाण्याने चपळगाव परिसरातील राजकारणात पोकळी निर्माण झाली असून त्यांची उणीव आम्हाला नेहमी भासत आहे,अशा प्रकारची भावना सातव्या पुण्यतिथी दिनानिमित्त गावच्या नागरिकांनी व्यक्त केली.
चपळगावचे दिवंगत सरपंच तथा भुविकास बँकेचे माजी चेअरमन बाणेगांव यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमीत्त चपळगाव ग्रामपंचायतीकडून अभिवादन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम न राबवता शासकीय नियमानुसार कार्यक्रम पार पडला.प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरूवातीला चपळगावचे सामाजिक कार्यकर्ते सिध्दाराम भंडारकवठे यांच्या हस्ते बाणेगांव यांच्या प्रतिमेचे
पूजन करण्यात आले.यावेळी युवा नेते बसवराज बाणेगांव, ग्रा.प.सदस्य गणेश कोळी,महिबूब तांबोळी,परमेश्वर वाले,श्रावण गजधाने,प्रकाश बुगडा,भिमू दुलंगे,अबुजर पटेल,सुरेश सुरवसे,विजय कोरे,विठ्ठल पाटील,ज्ञानेश्वर कदम,संगम भंगे आदी उपस्थित होते.यावेळी स्व.सुर्यकांत बाणेगांव यांनी लोकहितासाठी आयुष्यात धडपड केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.