ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वीज तोडणी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको,आंदोलनानंतर मिळाली स्थगिती

 

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट तालुक्यात महावितरण सुरू केलेल्या वीज बिल वसुली व तोडणीच्या विरोधात
शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकऱ्यांनी अक्कलकोटमध्ये रास्ता रोको केला.
यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. जोपर्यंत या मोहिमेला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशा प्रकारची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे महावितरणला अखेर हा निर्णय मागे घ्यावा लागला आणि स्थगितीबाबतचे लेखी पत्र महावितरणने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.सध्या अक्कलकोट तालुक्यात महावितरण कंपनीकडून सक्तीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे.एका बाजूला सरकारने अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही
असे सांगितले जाते.दुसरीकडे मात्र महावितरण कंपनीचे कर्मचारी सक्तीने वीज कनेक्शन तोडले जात आहे.
यासाठी आज शेतकऱ्यांनी आक्रमक
होत अक्कलकोट येथील महावितरण कार्यालय समोर सोलापूर अक्कलकोट रोडवर रास्ता रोको आंदोलन केले,अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.
तसेच लाॅकडाऊनच्या काळातील वीज
बिल तात्काळ माफ झाले पाहिजे ,तसेच शेतकऱ्यांना वीज बिल माफी देऊन त्यांचे कनेक्शन तोडणे तत्काळ थांबले पाहिजे आणि त्यांना हफ्त्यामध्ये बिल भरण्याची सुविधा मिळाली पाहिजे,यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी महावितरणचे अधिकारी संजीवकुमार म्हेत्रे यांनी तोडलेली वीज जोडणी पुन्हा जोडून देऊ, अशा प्रकारची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.यावेळी अमोल हिप्परगे,संतोष अंबड,रत्नशील जैनजांगडे,मनोज जाधव,सागर माने,मारुती माने,रुद्रमुनी स्वामी,विजय मठ,सिद्धाराम इमडे,खय्युम जमादार,अमोल गुरव,अविनाश कदरगे, वजीर जमादार,प्रकाश पाटील,सचिन खडके,बसवराज म्हेत्रे,गोपाळ कुंभार
आदी संघटनेचे पदाधिकारी व
शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!