तारामाता शिशु व प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे; आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती
अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था संचलित श्री तारामाता शिशु विकास मंदिर व प्राथमिक शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांबरोबरच पालकांची ही भूमिका महत्त्वाची आहे, असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रमोद मोरे हे होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजीव माने, माजी नगराध्यक्ष बसलिंग खेडगी, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, माजी जि.प.सदस्य आनंद तानवडे, उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव, विश्वस्त बाळासाहेब मोरे, सुधाकर गोंडाळ, संतोष फुटाणे – जाधव, मोहन चव्हाण, स्वामीराव पाटील, प्रकाश पडळकर, स्वामीराव मोरे, भीमराव साठे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा कदम यांनी अहवाल वाचन केले.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, बालगीते, ऐतिहासिक गीते, लावणी नृत्य हिंदी मराठी चित्रपटातील गीते सादर केली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयोगिता साळुंखे, रागिणी जाधव, शितल गोडसे ,अंजली जाधव, प्रशांत संगोळगी, अरिफ शेख, उमा गोंडाळ ,पूनम इंगळे, अमोल पाटील, शितल जाधव, लता शिर्के, सुवर्णा सुरवसे, वैशाली फुटाणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कदम यांनी केले.