ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास ठाकरे सरकारची परवानगी, हजार चौरस फुटाच्या दुकानातच करता येणार वाईनची विक्री

मुंबई : राज्यातील सुपर मार्केटमध्ये आता वाइनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १ हजार चौरस फुटाच्या दुकानातच विक्री करता येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी असताना आता १ हजार चौरस फुटांच्या छोट्या दुकानमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळांवर वायनरी चालते त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.

सरकारच्या या निर्णयावर विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून या सरकारला फक्त दारुड्यांची काळजी आहे. उद्याची पिढी बरबाद होईल याची त्यांना पर्वा नाही. शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर सुपर मार्केटमध्ये वाइन विकण्याचा व्यभिचार एका अर्थाने हे सरकार करत आहे. शुद्धीवर नसलेल्या सरकारचा हा एक भरकटलेला निर्णय आहे. अस त्यांनी म्हंटले आहे.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1000 कोटी लिटर पर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने आता राज्य सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

राज्यात वाईनची दरवर्षी ७० लाख लिटर विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळे हा आकडा १ हजार कोटी लिटर पर्यंत वाढवण्याचा अपेक्षा आहे. मात्र त्याआधी राज्य सरकारने वाइन वर प्रतिलिटर दहा रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. उत्पादन सरकारने याआधीच आयात विस्की वरील शुल्क 300 टक्यां ज वरून १५० टक्यांल् वर आली आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईट विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!