कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी शिवप्रेमींची माफी मागून शिवप्रतिमेला दुग्धाभिषेक करावा, अन्यथा कर्नाटकच्या गाड्या अडवू : डाॅ. बगले
सोलापूर: – बेंगलोर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणे ही निंदनीय घटना असून भ्याड कृत्य आहे.याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी लिंगायत समाजाच्या वीरशैव संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष डाॅ बसवराज बगले यांनी केली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोमई यांना कन्नड भाषेत निवेदन पाठवून डाॅ.बसवराज बगले यांनी सीमावर्ती भागातील जनतेच्या भावना कळविल्या आहेत. त्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की,कर्नाटकात महात्मा बसवेश्वरां बद्दल जशी अपार श्रद्धा आहे,त्याचप्रमाणे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल प्रचंड आदर आणि अभिमान आहे.शिवरायांच्या शौर्याने कर्नाटकातील अनेक भूभाग आदिलशाहीच्या जुलूमी जाचातून मुक्त झाले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्नाटकातील शौर्यगाथा नजरेआड करून चालणार नाही,अशा एका महापुरूषांचा अपमान आणि विटंबना कुणीही सहन करणार नाही.
बेंगलोर मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयावर काळी शाई फेकून ज्या माथेफिरु समाजकंटकाने भ्याडपणाचे कृत्य केले आहे.त्यामुळे राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्याचे रक्षण करण्यात कुचराई झाल्याची जबाबदारी कर्नाटक सरकारने स्वीकारलीच पाहिजे,त्यासाठी छक्त्रपती शिवरायांची आणि तमाम शिवप्रेमींची माफी मागावी,अन्यथा कर्नाटकातून सोलापूर भागात येणारी सरकारी वाहने आणि परिवहन महामंडळाची वाहने अडवण्यात येतील,असेही डाॅ.बसवराज बगले यांनी निवेदनाद्वारे केली आहे