आघाडीचा निर्णय परिस्थितीनुसारच; ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांपासून सांभाळून राहण्याचा शरद पवारांनी दिला सहकार्यांना सल्ला
मुंबई : केंद्रातील भाजपचे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याने ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांपासून सांभाळून राहण्याचा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना दिल्याचे माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात पार पडली. या बैठकीत पवारांनी आपल्या सहकार्यांना वरील सल्ला दिल्याची सांगण्यात येत आहे.
या बैठकीत आगामी महानगरपालीक, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती निवडुक संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी करताना त्या-त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती ध्यानात घेऊन नंतरच आघाडी करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीत मंगळवारी एकमत झाल्याचे समजते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस किंवा शिवसेनेसोबत आघाडी करताना त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मगच निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले. ओबीसीचा मुद्द्यावर जोपर्यंत मार्ग निघत नाही, तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाहीत यावरही यावेळी पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.
या बैठकीस उपमुख्यमंत्री अजीत पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि इतर अन्य नेते उपस्थीत होते.