ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समतावादी साहित्य संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तूर्त स्थगित

सोलापूर :  दिनांक ७,८व,९ जानेवारी रोजी बार्शी मध्ये सहावे राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते मात्र कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे व शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे तसेच सामाजिक भान राखून सदरचे हे संमेलन तूर्त स्थगित करत आहोत अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष जयकुमार शितोळे यांनी पत्राद्वारे जाहीर केले .

कोरोना चा प्रादुर्भाव कमी होतात व शासन नियमावली शिथिल होता च संमेलन घेत असल्याचे ही पत्रात नमूद करण्यात आले आहे. संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे तरी देखील महाराष्ट्रातून येणाऱ्या पाहुणे, वक्ते, कवी , साहित्यिक सर्व शी संपर्क करून सुसंवाद साधून संयोजन समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!