‘प्रेम म्हणजे काय असतं’ हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
सोलापूर – 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या तख्त प्रोडक्शन निर्मित ‘प्रेम म्हणजे काय असतं’.या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक प्रसाद इंगवले आणि कलाकार ऋतुजा टंकसाळे , पायल कदम , सुरज माने आणि प्रसाद इंगवले यांचा प्रेम म्हणजे काय असतं हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
सर्व नवीन कलाकारांना सोबत घेऊन प्रसाद इंगवले यांनी महाराष्ट्रात चित्रित केलेला वेगळ्या धाटणीतील हा चित्रपट प्रेमाविषयी बरच काही सांगून जातो. प्रेमाची वेगळी व्याख्या सांगणारा हा चित्रपट सोशल मीडियावर याचे गीत तरुणाईला भुरळ घालत आहेत.
‘चंद्रामध्ये चेहरा तुझा’ आणि लवलवत्या नयनांनी ही गीते आदर्श शिंदे , निधी हेगडे यांनी वेगळ्या शैलीत ग्रामीण गायलेले गिते सध्या सोशल मीडियावर तरुणांना भुरळ घालत आहेत.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेले कलाकार या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.नाटक , एकांकिका , शॉर्ट फिल्म ते चित्रपट असा या कलाकारांचा प्रवास आहे.हा चित्रपट तयार करण्यासाठी साडेचार वर्षाचा कालावधी लागला आहे.महाराष्ट्रातील 450 सिनेमागृहांमध्ये 4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम द्यावे असे आवाहन ‘प्रेम म्हणजे काय असतं’ या चित्रपटातील कलाकारांनी केले आहे.