अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदापासून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२४ चे आयोजन करण्यात आले असून, गुरुवारी सायंकाळी जाणता राजा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगाचा भव्य हालत्या देखाव्याचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाले.
दरम्यान श्री तुळजाभवानी माता मंदिरात महापूजा, आरती आमदार सचिन कल्याणशेट्टी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले.
याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित मोहन पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे अण्णू पुजारी व धनु पुजारी, जेष्ठ समाज सेवक सुरेशचंद्र सूर्यवंशी (वकील काका), जेष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर, मारुती बावडे हे प्रमुख उपस्थित होते. न्यासाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.
सदर देखावा हा घटस्थापने पासून ते विजयादशमी पर्यंत सर्व देवी भक्त व शहर वाशीयांसाठी असणार आहे. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावेत असे आवाहन संस्थेचे सचिव शामराव मोरे यांनी केले आहे.
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, डॉ.सतीश बिराजदार, न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, अमित थोरात, सौरभ मोरे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अतिश पवार, सायबण्णा जाधव, मोहनराव चव्हाण, पिंटू दोडमनी, गणेश भोसले, गणेश सुरवसे, नागराज कुंभार, नागू कलशेट्टी, अशपाक काजी, स्वामिनाथ गुरव, मैनुद्दीन कोरबू, शंकरराव कुंभार, आकाश बनसोडे, इब्राहीम कोरबू, तानाजी कोटारे, श्रीशैल कोटनुर व शहाजी बापू यादव, वैभव मोरे, पिट्टू साठे, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाटगे, प्रथमेश पवार, गोविंदराव शिंदे, कुमार पाटील, संजय शिंदे, विशाल कलबुर्गी, विकास पवार, सागर जाधव, सागर पवार, नामा भोसले, अनिल गवळी, अप्पा हंचाटे, राजेंद्र काटकर, बाबुशा महिंद्रकर, श्रीनिवास गवंडी, गणेश पाटील, स्वामिनाथ बाबर, सोनू पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, तानाजी पाटील, राजू पवार, राहुल इंडे, शिव स्वामी, महांतेश स्वामी, सिद्धराम कल्याणी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, धनंजय निंबाळकर यांच्या सह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवशरण अचलेर यांनी केले.