ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यातील “या” शहरात अँटीबीडी कॉकटेल पद्धतीला मोठं यश

सोलापूर : बार्शी शहरातुन कोरोना उपचार संदर्भात दिलासादायक बातमी समोर आली आहे. यानुसार कोरोना रुग्णांवर ओपीडी बेस उपचार होणार आहे. प्रयोग शाळेत कृत्रिम रित्या तयार करण्यात आलेल्या अँटीबॉडीज म्हणजेच मोनोक्लोनल अँटीबॉडीज परिणामकारक ठरत असल्याचे समोर आली आहे.

बार्शी येथील डॉ. संजय अंधारे यांनी कोरोना संसर्ग झालेल्या चार रुग्णांवर केलेल्या प्रयोगाला यश मिळाले आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

या पद्धतीमुळे कोरोना विषाणूला लक्ष्य करण्यास शक्य होत आहे. त्याबरोबरच शरीरात होणारी कोरोना विषाणूची उत्पत्ती थांबविण्यात येते. हाच प्रयोग बार्शीतील डॉ. संजय अंधारे यांनी यशस्वी केला आहे.

एका डॉक्टरच्या ६५वर्षीय आई आणि एका वकिलाच्या वडिलांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या शरीरातून कोरोना विषाणू नाहीसे झाले. दुसऱ्याच दिवशी त्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडी देऊन घरी पाठवण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!