राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला घेण्याचं खंडपीठानं केलं निश्चित
दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी घटनापीठाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १४ आमदारांच्या अपात्रतेची याचिका, राज्यपालांची सत्तास्थापनेतील भूमिका, विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार याबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टानं येत्या १४ फेब्रुवारीला सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.
ठाकरे गटाकडून एका मुद्द्यावर हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठाकडे सुनावणी झाली. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडल्यानंतर घटनापीठाने ही सुनावणी पुढे ढकलत असल्याचे सांगितले. घटनापीठाने पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला निश्चित केली