कुरनूर : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील युवकांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे क्रीडांगणाची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याबद्दल आमदार कल्याणशेट्टी यांनी सकारात्मकता दर्शवली असून येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्ण करू अशा प्रकारच आश्वासन ते युवकांना दिले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम असो अथवा राजकारण या क्रीडांगणाचा विषय नेहमीच चर्चेत असतो. गेल्या अनेक दिवसापासून क्रीडांगणाची सातत्याने मागणी होताना दिसत आहे.खरं तर गेल्या अनेक दिवसापासून कुरनूर येथील युवक क्रीडांगणाच्या प्रतीक्षेत आहेत.याबद्दल अनेक नेत्यांना ते त्यांच्याकडे क्रीडांगणाची मागणी केलेली आहे.आज पुन्हा एकदा आमदार कल्याणशेट्टी यांची कुरनूर येथील युवकांनी भेट घेतली आहे.
वास्तविक पाहता पंचक्रोशीत कुरनूर येथे सैन्य भरती आणि पोलीस भरती करणारे युवक जास्त प्रमाणात आहेत. गावातील रस्ते हे पळण्यासाठी एकही परिपूर्ण नाही.आणि गावाला क्रीडांगणही नाही.त्यामुळे आम्ही विविध खेळांच्या स्पर्धेचा सराव आणि सैन्य भरती असेल किंवा पोलीस भरती असेल सराव कुठे करायचा असा सवाल त्या युवकांचा आहे.गावात सातत्याने अनेक खेळांच्या स्पर्धा होत असतात.मात्र क्रीडांगण नसल्याने या खेळाच्या स्पर्धा सुद्धा अलीकडच्या काळामध्ये रखडलेले आहेत. त्यामुळे तरुणांना खेळाच्या संबंधित वाव कसा मिळणार असा प्रश्न आहे. त्यामुळे लवकरात क्रीडांगण होणे गरजेचं आहे.
येथील अनेक मुलांमध्ये खेळाचे कौशल्य आहे. मात्र योग्य प्रशिक्षण आणि दिशा त्यांना मिळत नाही.त्यामुळे ते मागे राहतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हे क्रीडांगण होणे तर तरुणांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.यावेळी युवा नेते राहुल काळे, बालाजी मोरे, विष्णू जाधव, अमोल काळे, विकास मोरे,अप्पू काळे, आदी युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.