ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने लावले घरावर काळे झेंडे

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देणारा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. उलट परस्परांवर आरोप करण्यात व्यग्र असलेल्या राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने आजपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या उपस्थितीत राजकारण्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली. काळे कपडे घालून स्वतःच्या घरावर पाटील यांनी काळा झेंडा लावला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत समाजानेही स्वतःच्या घरावर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त करावा, असे आवाहन केले.

कोरोनाच्या या महामारीमधे आम्ही रस्त्यावर उतरनार नाही एक एक प्राण आम्हाला महत्वाचा आहे. मराठा समाज व इतरांनी स्वतःच्या घरावर काळा झेंडा लावून निषेध व्यक्त करावा- विनोद पाटिल

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!