ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बदलत्या परिस्थितीत जगण्यास सक्षम होणे हाच उपाय आहे,संदीप भाजीभाकरे यांचे प्रतिपादन

सोलापूर – कोरोना ने निर्माण केलेल्या विशिष्ट परिस्थितीतून तगून जाण्यासाठी बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवली पाहिजे असे प्रतिपादन मुंबई पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी काल सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना केले. सोलापूर सोशल फाउंडेशन च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून या ऑनलाईन व्याख्यानमालेला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

श्री भाजीभाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आणि आपले जीवन यावर विचार मांडले.कोरोनामुळे निर्माण परिस्थितीत कॉमन सेन्स आणि विवेक बुद्धी यांच्या मदतीनेच आपण त्याचा प्रतिकार करू शकतो असे श्री भाजीभाकरे म्हणाले. मला कोरोना होणारच नाही अशा बेफिकिरी मध्ये काही लोक राहतात हे एक टोक आहे. या टोकावर जगणारे लोक कसलीच काळजी घेत नाहीत. तर दुसऱ्या टोकाला कोरोना झाल्यामुळे खुपच घाबरुन जाणारे लोक आहेत. या दोन स्थिती मधला सुवर्णमध्य म्हणजेच कोरोनाशी जुळून घेऊन जगणे.

तेव्हा या काळामध्ये सुरक्षित जगणे म्हणजे थोडीशी लक्षणे दिसताच ताबडतोब चाचणी करून घेणे आणि कोरोना झालाच तर त्याला धैर्याने तोंड देणे आहे असेही श्री भाजीभाकरे यांनी सांगितले. मानसिक व शारीरिक फिटनेस अतिशय महत्वाचा फॅक्टर या रोगाचा मुकाबला करण्याकरिता असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये उल्लेख केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!