ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नूपुर शर्मावर जी कारावाई करण्यात आली तशीच कारवाई शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर करण्यात यावी – उदयन राजे भोसले

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोशैयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पुण्यातील विविध संघटनांनी आणि पक्षांनी मिळून आज पुणे बंदची हाक दिली आहे. पुण्यातील व्यापारी त्याचप्रमाणे रिक्षा चालक, हमालपंचायत, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आदींनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर निषेध रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे , प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले. हा मोर्चा लाल महाल येथे आल्यावर खासदार उदयन राजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उदयनराजे भोसले म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचले असे असतांना त्यांचा सन्मान व्हावा हे सांगण्याची आज वेळ येते ही शोकांतिका आहे. मी याधीही माझी भूमिका मांडली आहे. ज्या प्रमाणे नूपुर शर्मा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली त्याच पद्धतीने शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी खासदार उदयन राजे भोसले यांनी केली.

आज मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले. यावरून ३५० वर्षानंतरी महराजांबद्दल प्रेम आणि आदर किंचितही कमी झालेले दिसत नाही. ज्या वेळी मी रायगड ला गेलेलो तेव्हा मला वेदना झाल्या. काही फुटकळ आणि विकृत लोक कारण नसतांना विधाने करतात असे म्हणत त्यांनी राज्यपाल आणि आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर निशाण साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!