राज्यात वादग्रस्त विधानांचे सत्र सुरुच..! शिवप्रताप दिनीच भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी देखील केले वादग्रस्त विधान
मुंबई : राज्यात सध्या प्रचंड वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदि यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आज भाजप नेते आणि राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. या विधानामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे. वाद निर्माण झाल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिली आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी केली नाही, तर फक्त मी एक उदाहरण दिली आहे, असे सांगितले आहेत. कृपया माझ्या विधानाचा कोणी विपर्यास करू नये, असेही आवाहन त्यांनी म्हंटले आहे.
शिवप्रताप दिनी आज प्रतापगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणादरम्यान मंगल प्रभात लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते. पण, ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवले होते. पण, महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असे त्यांनी म्हंटले आहे. मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात त्यांच्या पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
या लोकांना साधी भूमिका देखील कळत नाही – अजित पवार
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर बोलताना विरोधिपक्ष नेते अजित पवार म्हणाले की, वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगत आहे. ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी भूमिका देखील या लोकांना कळत नाही. एकनाथ शिंदे स्टेजवर असातानाच त्यांच्या देखतच तुलना केली. आपण कोणाशी तुलना करतोय, काय करतोय आपल्याला जबाबादरी काय, आपण कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा विचार करावा. असे अजित पवार यावेळी म्हणाले.
लोढांचे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान – आदित्य ठाकरे
ज्यांना महाराष्ट्र गद्दार समजतो, खोकेबाज समजतो, त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे पूर्वनियोजीत आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम शिंदे सरकारकडून सुरू आहे. त्यानुसारच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्य केले आहे. मंत्री लोढांचे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. केवळ शिवरायच नव्हे तर महाराष्ट्राचाही अपमान आहे. अशी प्रतिक्रिया युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मंगलप्रभात लोढा यांचे हे दुर्दैवी वक्तव्य – अमोल मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोढा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मंगलप्रभात लोढा यांचे हे दुर्दैवी वक्तव्य आहे, तसे लोढा आणि शिवाजी महाराजाच्रूा इतिहासाचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही, त्यांचा तितका अभ्यासही असेल असे मला वाटते. त्यांच्याकडे पर्यटन खाते असले तरी एवढी त्यांची बुद्धीमत्ता नाही अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.