ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एसटी संपावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ; एसटीचे खाजगीकरण होणार?

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर असून एसटी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात संप पुकारले आहेत. राज्य सरकारने आवाहन केल्या नंतर ही संपकरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. संपावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकारचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

एसटीच्या खासगीकरणाच्या दिशेने राज्य सरकारने पडताळणी सुरू केली आहे खासगीकरणाच्या बाबा चा अहवाल देण्यासाठी एसटी महामंडळाकडून केपीएमजी संस्थेची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे एसटी महामंडळ तोट्यात आहे, त्यातच तुटपुंज्या उत्पन्न आणि खर्च जास्त अशी एसटीची स्थिती आहे.

संपाच्या काळात प्रवाशांकडून कोणतेही तीव्र प्रतिक्रिया आली नाही याचा अर्थ एसटीची प्रवाशांना गरज असल्याचे चित्र आहे. प्रवाशी खासगी बस प्रवासावर अवलंबून आहेत. त्यामुळेच एसटीच्या खासगीकरणाच्या दिशेने सरकारने पहिले पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!