ध्यास विश्वसार्ह बातमीचा

टूलकिट प्रकरण: निकिता जेकबला जामीन मंजूर

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून टूलकिट प्रकरणसमोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी दिशा रवीला अटक केल्यानंतर टूलकिट प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात संशयित असलेल्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. दिल्ली पोलिसांना अटकेची कारवाई करता येऊ नये, यासाठी निकिता जेकब यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. आज बुधवारी १७ फेब्रुवारी रोजी मुंबईउच्च न्यायालयाने निकिता जेकबला ३ आठवड्यांसाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे निकिताला मोठा दिलासा मिळाला आहे.

दिल्ली पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. निकिता ‘टूलकिट’च्या एक संपादक आहेत. निकिता यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तपासाला सहकार्य करत असताना तिला केली जाऊ शकत नाही. टूलकिटमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की त्यामुळे लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेसाठी ‘टूलकिट’ ला जबाबदार धरण्यात यावे.

याच प्रकरणात संशयित असलेले शंतनू मुळूक यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १० दिवसांचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला. मात्र, यावर दिल्ली पोलिसांच्यावतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात हे प्रकरण येत नसल्याने न्यायालय त्यावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे म्हटले होते. निकिता जेकब मुंबई उच्च न्यायालयात वकिलीचा सराव करतात. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून सोमवारी दिल्ली न्यायालयाने निकिता जेकब यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!