ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पंचवीस जणांवर “या” प्रकरणी गुन्हा दाखल

औरंगाबाद : औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या तक्रारीवरून जलील यांच्यासह पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार इम्तियाज जलील मंगळवारी कामगार उपायुक्त कार्यालयात गेले होते. बंद काळात सील केलेले दुकान उघडण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांसोबत क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले होते.यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोळ यांना बोलताना गैरवर्तन करत एकेरी भाषा वापरली. “व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यासाठी परवानगी दे, त्यांना काय दंड लावणार आताच सांग” असे शब्द इम्तियाज जलील यांनी वापरले. याप्रकरणी उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३५३, ३३२, १८८, २६९ प्रमाणे खासदार जलील यांच्यासह पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!