मुंबई : मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याची वृत्त एएनआयने दिली आहे.
दुर्घटने मधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईच्या चेंबूरमधील आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये मध्यरात्री अतिपावसामुळे डोंगर पायथ्याशी बांधलेल्या भिंती वर दरड कोसळली. त्यामुळे ही भिंतीला लागूनच असलेल्या घरांवर कोसळली आणि मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एनडीआरएफच्या पथक अजूनही घटनास्थळी असून मलवा हटवण्याचा काम युद्धपातळीवर सुरू आहे.
चेंबूर येथे घडलेल्या घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केले आहेत.
मुंबई के चेंबूर और विक्रोली में भारी वर्षा के कारण हुए हादसों में कई लोगों के हताहत होने की खबर से अत्यंत दुःख हुआ। शोक-संतप्त परिवारों के प्रति मैं संवेदना व्यक्त करता हूं तथा राहत व बचाव कार्य में पूर्ण सफलता की कामना करता हूँ।
— President of India (@rashtrapatibhvn) July 18, 2021
Saddened by the loss of lives due to wall collapses in Chembur and Vikhroli in Mumbai. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families. Praying that those who are injured have a speedy recovery: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 18, 2021
मुंबई के चेंबूर में हुए हादसे की हृदयविदारक
सूचना से स्तब्ध हूँ। इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ। ईश्वर शोक संतप्त परिजनों को यह दुःख सहने की शक्ति प्रदान करें।— Amit Shah (@AmitShah) July 18, 2021